2 Kings 6:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
असे चाललेले असताना इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन चालला होता. तेव्हा एका बाईने त्याला मोठ्याने हाक मारली आणि सांगितले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरुन मला मदत करा!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचा राजा तटावर फिरत असताना एका स्त्रीने ओरडून त्याला म्हटले, “अहो स्वामीराज, साहाय्य करा!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी इस्राएलाचा राजा तटावरून फेर्या मारीत असताना, एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “माझे स्वामी महाराज, मला साहाय्य करा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन फिरत होता. तेव्हा एका स्त्रीने त्यास मोठ्याने ओरडून म्हटले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरून मला मदत करा!”