2 Kings 6:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाही तरी मी कशी तुला मदत करु? माझ्या जवळ तुला देण्यासारखे काहीच नाही ना खळ्यांतले धान्य, ना द्राक्षकुंडातील द्राक्षारस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “परमेश्वर तुला साहाय्य करत नाही तर मी कोठून करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने उत्तर दिले, “खुद्द याहवेह तुला साहाय्य करीत नाही, तर मी तुझी साहाय्यता कशी करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाहीतर मी तुला कोठून मदत करु? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?”