2 Kings 6:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडीलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांना म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा दार लावून घ्या. त्याला अजिबात आत येऊ देऊ नका. त्याच्या मागेमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहूल मला लागली आहे!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अलीशा त्या वेळी आपल्या घरात बसला असून त्याच्या भोवती वडील जन बसले होते; राजाने आपल्या जवळचा एक जासूद पाठवला; तो जाऊन पोहचण्यापूर्वी अलीशा त्या वडील जनांना म्हणाला, “पाहा, ह्या खुनी मनुष्याच्या पुत्राने माझे शिर छेदण्यास मनुष्य पाठवला आहे; तर तो जासूद आला म्हणजे कवाडे लावून घेऊन त्याला लोटून द्या; त्याच्या मागोमाग त्याच्या धन्याच्या पावलांची चाहूल ऐकू येत आहे, नाही काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अलीशा आपल्या घरात बसलेला होता आणि वडीलजन त्याच्यासोबत बसलेले होते. राजाने आपल्यापुढे दूत पाठविला, पण तो येण्यापूर्वी अलीशा वडीलजनांना म्हणाला, “या खुनी मनुष्याने माझा शिरच्छेद करण्यासाठी कोणाला तरी पाठविले आहे, हे तुम्ही पाहिले काय? पाहा, जेव्हा दूत येईल तेव्हा दार बंद करून त्याला बाहेरच ठेवा, कारण त्याच्या पाठोपाठ त्याच्या धन्याच्या पावलांचा आवाज आहे की नाही?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडिलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांस म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा त्यास लोटून दार लावून घ्या. त्याच्या मागोमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहुल मला लागली आहे!”