2 Kings 7:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अलीशाने सांगितले होते, “लोकांना मणभर मैदा किंवा दोन मण सातू शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजार पेठेत एका शेकेलला घेता येईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाचा माणूस राजाला म्हणाला होता की, “उद्या ह्याच वेळेस शोमरोनाच्या वेशीत एका शेकेलाला दोन मापे सातू व एका शेकेलाला एक माप सपीठ मिळेल.” तसेच झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या मनुष्याने राजाला सांगितल्याप्रमाणे झाले: “शोमरोनच्या वेशीजवळ एका शेकेलास एक सिआ सपीठ आणि एका शेकेलास दोन सिआ सातू विकत मिळू लागेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अलीशाने राजाला सांगितले होते, “लोकांस मणभर मैदा किंवा दोन मण सातू शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजार पेठेत एका शेकेलला घेता येईल.”