2 Kings 7:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण करतो ते बरे नाही. आज आपल्याजवळ चांगली बातमी असून आपण गप्प आहोत. सकाळी उजाडे पर्यंत जर आपण हे कुणाला सांगितले नाही तर आपल्याला नक्कीच शासन होईल. तेव्हा आपण आता राजवाड्यात राहणाऱ्या लोकांना या गोष्टीची वर्दी देऊ.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते आपसांत म्हणू लागले, “आपण करत आहोत ते बरे नाही; आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल; तर चला, आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “आपण जे करत आहोत ते योग्य नाही. हा आनंदाच्या शुभवार्तेचा दिवस आहे आणि ती आपण स्वतःजवळच ठेवीत आहोत. जर आपण सकाळ होईपर्यंत थांबून राहिलो तर आपण दंडपात्र होऊ. तेव्हा चला, आपण राजवाड्यात जाऊन ही बातमी सांगू.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण करतो ते बरे नाही. आज आपल्याजवळ चांगली बातमी असून आपण गप्प आहोत. सकाळी उजाडेपर्यंत जर आपण हे कुणाला सांगितले नाहीतर आपल्याला नक्कीच शासन होईल. तेव्हा आपण आता राजवाड्यात राहणाऱ्या लोकांस या गोष्टीची वर्दी देऊ.”