2 Kings 9:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा योरामने इजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता. तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण अरामाचा राजा हजाएल ह्याच्याशी लढताना योराम1 राजाला अराम्यांच्या हातून जे घाव लागले होते ते सर्व बरे व्हावेत म्हणून तो इज्रेलास परत गेला होता.) येहू म्हणाला, “तुमच्या मनास येईल तर ह्या नगरातून कोणालाही इज्रेलास हे कळवण्यासाठी निसटून जाऊ देऊ नका.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण यहोराम राजा हा अरामचा राजा हजाएलशी लढताना ज्या जखमा अरामी लोकांनी दिल्या होत्या, त्या जखमा बर्या व्हाव्यात म्हणून तो येज्रीलला परतला होता.) येहू म्हणाला, “मी राजा व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण काय केले आहे हे कोणीही या नगरीतून निसटून ही बातमी येज्रीलमध्ये कोणालाही कळवू नये म्हणून खबरदारी घ्या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा योथामाने हजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामाला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता. तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.”