2 Kings 9:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेंव्हा या शेतात मी अहाबला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘परमेश्वर म्हणतो, काल नाबोथाचा व त्याच्या पुत्रांचा खून झाला तो मी पाहिलाच आहे; परमेश्वराचे असे म्हणणे आहे की ह्याच शेतात मी तुला त्याची उलटफेड करीन.’ तर आता परमेश्वराच्या वचनानुसार ह्याला उचलून शेतात टाक.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह जाहीर करतात, ‘मी काल नाबोथचे रक्त आणि त्याच्या पुत्रांचे रक्त पाहिले आहे आणि याच भूमीवर मी याची परतफेड करेन, असे याहवेह जाहीर करतात. वध केल्याबद्दल मी त्याचा बदला अहाबाला या नाबोथच्याच भूमीवर देईन.’ म्हणून आता याहवेहच्या वचनानुसार, त्याला उचल आणि त्याला त्या भूमीवर फेकून दे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेव्हा त्या शेतात मी अहाबाला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”