2 Kings 9:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.” तेव्हा येहूच्या माणसांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पाहून यहूदाचा राजा अहज्या हा बागेतील भवनाच्या रस्त्याने पळून गेला. येहूने त्याचा पाठलाग करून म्हटले, “त्यालाही रथातच ठार करा.” त्यांनी त्याला इब्लामाजवळील गुरघाटात मार दिला. तो तसाच मगिद्दोपर्यंत पळून जाऊन तेथे मेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काय झाले ते पाहून, जेव्हा यहूदीयाचा राजा अहज्याह बेथ-हागानकडे जाणार्‍या मार्गाने पळाला. येहू त्याचा पाठलाग करता करता ओरडून म्हणाला, “त्यालाही मारा!” मग त्यांनी त्याला इब्लामजवळच्या गुर येथील चढणीवर रथातच घायाळ केले; तो मगिद्दोपर्यंत पळाला आणि तिथे तो मरण पावला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.” तेव्हा येहूच्या मनुष्यांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला.