2 Peter 1:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे काही जीवनासंबंधी व देवाच्या भक्तीसंबंधी आहे ते सर्व आम्हाला येशूच्या दैवी सामर्थ्याने दिले आहे. कारण ज्याने आम्हाला त्याच्या स्वत:च्या गौरवाने व चांगुलपणाने बोलविले आहे त्याला आम्ही ओळखतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्याने त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने तुम्हांआम्हांला त्याच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यासाठी पाचारण केले; त्याच्या ज्ञानाच्या द्वारे जीवनास व धार्मिकतेस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याने तुम्हाआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्त्विकते-साठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या दैवी सामर्थ्याने तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यास पाचारण केले, त्यांच्या ज्ञानाद्वारे जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्वगोष्टी आपल्याला दिल्या आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.