2 Peter 2:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
विशेषत: जे पापमय वासनांच्या भ्रष्ट मार्गाने गेले आहेत, आणि प्रभुचा अधिकार असताना देखील उद्धटपणे व मन मानेल तसे वागणारे ते लोक गौरवी देवदूतांची निंदा करायला भीत नाहीत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या मागे लागणारे व देवाचा अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. हे खोटे धर्मशिक्षक उद्धट, स्वच्छंदी आणि थोरांची निंदानालस्ती करण्यास न भिणारे असे आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. ते उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे, असे आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
विशेषकरून अशा लोकांसाठी हे खरे आहे जे देहाच्या भ्रष्ट अभिलाषांच्या मागे लागतात आणि अधिकारास तुच्छ मानतात. धाडसी आणि उद्धट असून ते स्वर्गीय प्राण्यांची निंदा करण्यास घाबरत नाहीत;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. स्वैर, स्वच्छंदी असे हे लोक, सत्तांविषयी वाईट बोलण्यात हे कचरत नाहीत.