2 Peter 2:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे जे खोटे शिक्षक आहेत ते लोकांना मोकळीक देण्याचे वचन देतात परंतु ते स्वत:च नाशवंत जीवनाचे दास आहेत. कारण एखाद्या मनुष्यावर ज्या गोष्टीचा पगडा बसलेला असतो त्याचा तो गुलाम बनतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः मात्र भ्रष्टतेचे दास असतात कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो, त्याचा तो दासही बनतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत; कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात जेव्हा ते स्वतःच दुष्टतेचे दास आहेत, कारण “लोक ज्याच्या अधिकारात आहेत, ते त्याचे दास आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना ते स्वातंत्र्याचे वचन देतात तेव्हा स्वतः दुष्टतेचे दास असतात कारण ज्याच्याकडून कोणी जिंकलेला आहे त्याच्या दासपणातही तो आणलेला आहे.