2 Peter 2:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांच्या बाबतीत जे घडले ते या खऱ्या म्हणीत सांगितले आहे: “आपल्याच ओकीकडे परतणारा कुत्रा” आणि दुसऱ्या म्हणीत: “स्वच्छ केले तरी चिखलात लोळणारे डुक्कर.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे’ व ‘अंग धुतल्यानंतर चिखलात लोळण्यास परतलेली डुकरीण’, अशा ज्या म्हणी आहेत त्यांच्यासारखी त्यांची गत झालेली असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे’ व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली ‘डुकरीण’, अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशा लोकांसाठी या म्हणी खर्‍या आहेत: “कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो,” आणि “धुतलेली डुकरीण तिच्या चिखलात लोळण्यास परत जाते,” अशा म्हणींप्रमाणे त्यांची गत झालेली असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण कुत्रे आपल्या ओकीकडे पुन्हा फिरते आणि धुतल्या नंतर डुकरीण लोळण्यासाठी घाणीत शिरते, ही जी खरी म्हण तिच्याप्रमाणे हे त्यांना झाले आहे.