2 Peter 3:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर अशा प्रकारे सर्व गोष्टींचा नाश होणार आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचे लोक असायला पाहिजे याचा विचार करा. तुम्ही आपले जीवन पवित्रतेने जगावे व देवाच्या सेवेत रममग्र असावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ही सर्व अशी लयास जाणार आहेत, म्हणून पवित्र व धार्मिक जीवन जगून देवाचा दिवस येण्याची वाट पाहणारे व तो दिवस लवकर यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणारे तुम्ही असावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याअर्थी सर्वकाही अशा रीतीने नष्ट होणार आहे, त्याअर्थी तुम्ही कशाप्रकारचे लोक असणे आवश्यक आहे? तुम्ही पवित्र आणि सुभक्तीत जीवन जगले पाहिजे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?