2 Peter 3:14 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी तुम्ही या गोष्टींची वाट पाहत आहात, त्याअर्थी आपणास प्रभूसमोर डागरहीत, दोषरहित व शांतता टिकविण्यांचा आटोकाट प्रयत्न करा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे त्याच्याबरोबर शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर मग प्रिय मित्रांनो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्यांच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे त्यांच्याबरोबर शांतीत असलेले त्यांना आढळून यावे म्हणून प्रत्येक प्रकारे प्रयत्न करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून प्रियजनहो, या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.