2 Peter 3:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या पत्रात, जसे इतर सर्व पत्रांत असते, त्याप्रमाणे तो या गोष्टीविषयी सांगतो. त्याच्या पत्रामध्ये काही गोष्टी आहेत ज्या समजण्यास कठीण आहेत. अज्ञानी व चंचल मनाचे लोक पवित्र शास्त्रातील इतर गोष्टींप्रमाणे या गोष्टींचादेखील विपर्यास करुन गैर अर्थ लावतात व परिणामी आपला स्वत:चा नाश करुन घेतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने आपल्या सर्व पत्रांत ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर धर्मशास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात, तसा ह्याचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे; त्यांत समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाही करतात; अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या विषयाचे वर्णन करून तो त्याच्या सर्व पत्रात त्याच प्रकारे लिहितो. त्याच्या पत्रातील काही गोष्टी समजावयास कठीण अशा आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर धर्मशास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा या पत्राचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजण्यास कठिण अशा काही गोष्टी आहेत आणि जे अशिक्षित व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाहि करतात; अशाने आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.