2 Peter 3:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु आता जे आकाश व पृथ्वी आहेत ती याच शब्दाने अग्निद्वारे नष्ट होण्यासाठी राखून ठेवली आहेत. त्यांना त्याच दिवसासाठी राखून ठेवण्यात आले आहे, जेव्हा अधार्मिक लोकांचा न्याय होऊन त्यांचा नाश होईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच देवाच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत ती राखून ठेवलेली आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता अस्तित्वात असलेले आकाश व पृथ्वी ही त्याच परमेश्वराच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत, अनीतिमान लोकांच्या न्यायाच्या दिवसासाठी आणि नाशासाठी ती राखून ठेवलेली आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण, आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली असून, ती न्यायानिवाडाच्या व भक्तीहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.