2 Samuel 10:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अम्मोन्यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएलातील उत्तम योध्द्यांची निवड केली. त्यांना अराम्यांच्या विरुद्ध लढायला सज्ज केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या मागे व पुढे व्यूह रचला आहे हे यवाबाने पाहून इस्राएली लढवय्यांपैकी निवडक शिपाई घेऊन त्यांना अराम्यांसमोर उभे केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शत्रूचे सैन्य आपल्यापुढे व मागे आहे हे योआबाला समजले; तेव्हा त्याने इस्राएली सैन्यातून उत्तम योद्धे निवडले व त्यांना अरामी सैन्याशी लढण्यास पाठविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अम्मोन्यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले तेव्हा त्याने इस्राएलातील उत्तम योद्ध्यांची निवड केली त्यांना अराम्यांच्या विरूद्ध लढायला सज्ज केले.