2 Samuel 11:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यवाब सेवकाला म्हणाला, “कदाचित राजा संतापून म्हणेल, “यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भितीवरुन शिरसंधान करतील हे त्याला ठाऊक असायला हवे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा जर संतापून म्हणाला की, ‘तुम्ही त्या नगराच्या एवढे जवळ जाऊन का युद्ध केले? शत्रू तटावरून बाण सोडतील हे तुम्हांला ठाऊक नव्हते काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाचा राग भडकेल आणि ते तुला विचारतील, ‘लढण्यासाठी तुम्ही त्या शहराच्या इतक्या जवळ का गेला? ते नगराच्या तटावरून बाण सोडतील याची कल्पना तुम्हाला नव्हती काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यवाब सेवकाला म्हणाला, कदाचित राजा संतापून म्हणेल यवाबाचे सैन्य नगराच्या इतके जवळ भिडले कसे? शत्रू तटाच्या भिंतीवरून शिरसंधान करतील हे त्यास ठाऊक असायला हवे.