2 Samuel 12:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीदाचे सेवक त्याला म्हणाले, “तुम्ही असे का वागत आहात? मूल जिवंत असताना तुम्ही अन्नत्याग केलात. शोक केलात पण मुलगा वारल्यावर मात्र तुम्ही उठलात आणि खाल्लेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या चाकरांनी त्याला विचारले, “आपण हे असे काय केले? मूल जिवंत होते तोवर आपण त्याच्यासाठी उपास व शोक केला, पण ते मरण पावताच आपण उठून भोजन केले?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या सेवकांनी त्याला विचारले, “तुम्ही हे असे का वागत आहात? मूल जेव्हा जिवंत होते, तेव्हा तुम्ही उपास केला आणि रडलात, परंतु आता मुलाचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही उठून भोजन करीत आहात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीदाचे सेवक त्यास म्हणाले, तुम्ही असे का वागलात? मूल जिवंत असताना तुम्ही अन्नत्याग केलात, शोक केलात. पण मुलगा वारल्यावर मात्र तुम्ही उठलात आणि खाल्लेत.