2 Samuel 12:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तूच तो माणूस आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, “इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला. तुला शौलापासून वाचवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नाथान दाविदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस. इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले व तुला शौलाच्या हातातून सोडवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, तूच तो मनुष्य आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला, तुला शौलापासून वाचवले.