2 Samuel 15:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गथ येथील इत्तयला राजा म्हणाला, “तू ही आमच्याबरोबर कशाला येतोस? मागे फिर आणि नवीन राजा अबशालोम याला साथ दे. तू परकाच आहेस ही तुझी माय भूमी नव्हे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा इत्तय गित्ती ह्याला म्हणाला, “तू आमच्याबरोबर का येतोस? तू आपला परत जाऊन राजाजवळ राहा; तू तर परका व हद्दपार केलेला आहेस; तू आपल्या स्थानी परत जा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा गित्ती इत्तय याला म्हणाला, “तू आमच्याबरोबर का येत आहे? परत जा आणि अबशालोम राजाबरोबर राहा. तू तर परदेशीय, तुझ्या जन्मभूमीतून बाहेर आलेला आहेस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गथ येथील इत्तयला राजा म्हणाला, तू ही आमच्याबरोबर कशाला येतोस? मागे फिर आणि नवीन राजा अबशालोम याला साथ दे. तू परकाच आहेस ही तुझी माय भूमी नव्हे.