2 Samuel 15:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीद डोंगरमाथ्यावर पोहोंचला. येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे त्या वेळी हूशय अकर् त्याला भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता, त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
डोंगराच्या माथ्यावर ज्या ठिकाणी देवाची आराधना करीत असत तेथे दावीद जाऊन पोहचला, तेव्हा हूशय अर्की त्याला भेटायला आला; त्याचा अंगरखा फाटलेला होता व त्याच्या डोक्यात धूळ घातलेली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद जेव्हा डोंगराच्या माथ्यावर जिथे लोक परमेश्वराची उपासना करीत असत तिथे जाऊन पोहोचला, तेव्हा अर्कीचा हूशाई त्याची वस्त्रे फाटलेली व डोक्यात धूळ घातलेला असा दावीदास भेटण्यास तिथे होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद डोंगरमाथ्यावर पोहोचला येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे. त्या वेळी हूशय अर्की त्यास भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता. त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती.