2 Samuel 15:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण तू यरुशलेमला परलास तर अहिथोफेलची मसलत तू धुळीला मिलवू शकशील. अबशालोमला सांग, “महाराज, मी तुमचा दास आहे. मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो. पण आता तुमची सेवा करीन.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तू नगरात परत जाऊन अबशालोमाला म्हण, ‘महाराज, मी आपला दास होतो; पूर्वी जशी मी आपल्या पित्याची नोकरी केली तशी मी आता आपली नोकरी करतो;’ असे केल्याने तू माझ्यासाठी अहीथोफेलाची मसलत निष्फळ करशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर तू परत शहराकडे जा आणि अबशालोमास म्हण, ‘महाराज, मी आपला सेवक होईन; आधी मी तुमच्या पित्याचा सेवक होतो, परंतु आता मी तुमचा सेवक होईन,’ असे केल्यास अहीथोफेलचा सल्ला निष्फळ करून तू मला मदत करशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तू यरूशलेमेला परतलास तर अहिथोफेलची मसलत तू धुळीला मिळवू शकशील. अबशालोमला सांग, महाराज मी तुमचा दास आहे. मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो, पण आता तुमची सेवा करीन.