2 Samuel 15:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अराममधील गशूर येथे राहात असताना मी तो बोललो होतो. परमेश्वराने मला पुन्हा यरुशलेमला नेले तर मी परमेश्वराच्या सेनेला वाहून घेईन असे मी बोललो होतो”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी अरामातील गशूर येथे राहत होतो तेव्हा आपल्या दासाने असा नवस केला होता की, परमेश्वराने मला यरुशलेमेत माघारी नेले तर मी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे करीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपला सेवक अराम येथील गशूर या ठिकाणी राहत असताना मी हा नवस केला होता: ‘जर याहवेह मला परत यरुशलेमास घेऊन जातील, तर मी हेब्रोन येथे याहवेहची उपासना करेन.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अराममधील गशूर येथे राहत असताना मी तो बोललो होतो, परमेश्वराने मला पुन्हा यरूशलेमेला नेले, तर मी परमेश्वराच्या सेनेला वाहून घेईन असे मी बोललो होतो.