2 Samuel 17:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद जेथे लपला असेल तेथून आम्ही त्याला धरून आणू. जमिनीवर दव पडावे तसे आम्ही त्याच्यावर तुटून पडू. दावीदाला त्याच्या बरोबरच्या माणसांसहित आम्ही ठार करु. कुणालाही सोडणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो असेल तेथे त्याच्यावर आपण एकदम छापा घालू आणि जमिनीवर दंव पडते त्याप्रमाणे आपण त्याच्यावर जाऊन पडू म्हणजे त्याचा व त्याच्याबरोबरच्या लोकांचा आपण मागमूस राहू देणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग तो सापडेल तिथे आपण त्याच्यावर हल्ला करू, आणि जसे जमिनीवर दव येऊन पडते तसे आपण त्याच्यावर पडू. मग तो किंवा त्याच्या माणसांपैकी कोणीही जिवंत सोडला जाणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद जेथे लपला असेल तेथून आम्ही त्यास धरून आणू जमिनीवर दव पडावे तसे आम्ही त्याच्यावर तुटून पडू दावीदाला त्याच्या बरोबरच्या मनुष्यांसहीत आम्ही ठार करू कुणालाही सोडणार नाही.