2 Samuel 17:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित् गेले सुध्दा असतील त्यांना तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, “अबशालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसर्या ठिकाणी लपून राहिला असेल. सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावेळेस सुद्धा ते गुहेत किंवा कुठे दुसर्या ठिकाणी लपले असतील. जर त्यांनी तुझ्या सैन्यावर प्रथम हल्ला केला, तर कोणीही त्याबद्दल ऐकून म्हणेल, ‘अबशालोमच्या मागे जाणार्यांचीच हत्या होत आहे.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित गेले सुध्दा असतील. त्यांनी तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, अबशालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत.