2 Samuel 18:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यवाबाच्या माणसांनी अबशालोमचा मृतदेह अरण्यातील एका खंदकात नेऊन टाकला. वर दगडांची रास रचून तो खंदक भरुन टाकला. अबशालोमबरोबर आलेल्या इस्राएलानी पळ काढला आणि ते घरी परतले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लोकांनी अबशालोमाला खाली काढून वनातल्या मोठ्या खड्ड्यात टाकले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली; मग सर्व इस्राएल लोक पळून आपापल्या डेर्‍यांकडे गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी अबशालोमला घेऊन, जंगलात एका खड्ड्यात फेकून टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली, त्या दरम्यान सर्व इस्राएली लोक आपआपल्या घरी पळून गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यवाबाच्या मनुष्यांनी अबशालोमचा मृतदेह अरण्यातील एका खंदकात नेऊन टाकला. त्यावर दगडांची रास रचून तो खंदक भरून टाकला. अबशालोमाबरोबर आलेल्या इस्राएलींनी पळ काढला आणि ते घरी परतले.