2 Samuel 18:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, “तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग.” त्या माणसाने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर यवाब एका कूशी माणसाला म्हणाला, “तू जे काही पाहिले ते जाऊन राजाला सांग.” तेव्हा तो कूशी यवाबाला नमन करून धावत गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर योआब एका कूशी मनुष्याला म्हणाला, “तू जे पाहिलेस ते जाऊन राजाला सांग.” त्या कूशी मनुष्याने योआबाला लवून मुजरा केला व धावत निघाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग त्या मनुष्याने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.