2 Samuel 19:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सादोक आणि अब्याथार या याजकांना राजा दावीदाने निरोप पाठवला, “यहूदातील वडीलधाऱ्यांशी बोला. त्यांना सांगा, राजा दावीदाला गादीवर आणायला तुम्ही शेवटचे घराणे का आहा? राजाने पुन्हा परतण्याविषयी सर्वच इस्राएल लोकांची बोलणी चाललेली आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दावीद राजाने सादोक व अब्याथार याजकांना सांगून पाठवले की, “यहूदी वडील जनांना सांगा, ‘राजाला मंदिरात परत न्यावे असे इस्राएल लोकांचे बोलणे चालले आहे हे राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या मंदिरात नेण्याच्या बाबतीत तुम्ही सर्वांच्या मागे का राहता?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद राजाने सादोक आणि अबीयाथार याजकांना निरोप पाठवला: “यहूदीयाच्या वडीलजनांना विचारा, ‘जे सर्व इस्राएलात बोलले जात आहे ते राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या राजवाड्यात आणण्यास तुम्ही सर्वात शेवटचे का आहात?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सादोक आणि अब्याथार या याजकांना राजा दावीदाने निरोप पाठवला, यहूदातील वडीलधाऱ्यांशी बोला. त्यांना सांगा, राजा दावीदाला गादीवर आणायला तुम्ही शेवटचे घराणे का आहा? राजाने पुन्हा परतण्याविषयी सर्वच इस्राएल लोकांची बोलणी चाललेली आहेत.