2 Samuel 19:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग राजा दावीद यार्देन नदीपाशी आला. यहूदातील लोक त्याला भेटायला गिलगाल येथे आले. राजाला यार्देन नदी पार करुन आणण्याचा त्यांचा मानस होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा मागे परतून यार्देनेपर्यंत आला आणि यहूदी यार्देन नदीच्या अलीकडे राजाला घेऊन येण्यासाठी गिलगाल येथे सामोरे गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर राजा परतला आणि यार्देनपर्यंत गेला. यहूदाहचे लोक गिलगाल येथे राजाला भेटण्यास आणि त्यांना यार्देनेच्या पार नेण्यास आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग राजा दावीद यार्देन नदीपाशी आला. यहूदातील लोक त्यास भेटायला गिलगाल येथे आले. राजाला यार्देन नदी पार करून आणण्याचा त्यांचा हेतू होता.