2 Samuel 19:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मला पुन्हा परत घरी जाऊ दे. म्हणजे माझ्या गावात मी देह ठेवीन आणि माझ्या आईवडीलांच्या कबरीतच माझे दफन होईल. पण किम्हनला आपला चाकर म्हणून बरोबर घेऊन जाऊ शकतोस. महाराज आपल्या मर्जीप्रमाणे त्याला वागव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या दासाला परत जाऊ द्या. म्हणजे माझ्या स्वतःच्या गावी माझ्या आईबापाच्या कबरस्तानाजवळ मी मरेन; पण आपला दास किम्हाम हा हजर आहे. त्याला माझ्या स्वामीराजांबरोबर पलीकडे जाऊ द्या; मग आपणाला वाटेल ते त्याचे करा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या सेवकाला परत जाऊ द्या, की मी माझ्या नगरात, माझ्या पित्याच्या व आईच्या कबरेजवळ पुरला जाईन. परंतु आपला सेवक किमहाम येथे आहे. त्याला माझ्या स्वामीबरोबर पार जाऊ द्यावे, व आपणास जे योग्य वाटेल ते आपण त्याचे करावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मला पुन्हा परत घरी जाऊ द्या. म्हणजे माझ्या गावात मी देह ठेवीन आणि माझ्या आईवडीलांच्या कबरेतच माझे दफन होईल. पण किम्हानला आपला चाकर म्हणून बरोबर घेऊन जाऊ शकता. महाराज आपल्या मर्जीप्रमाणे त्यास वागवा.