2 Samuel 19:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यवाब राजाच्या निवासस्थानी आला आणि त्याला म्हणाला, “आपल्या सेवकांना तू आज मान खाली घालायला लावली आहेस. तुझ्या सेवकांनी तुझा जीव वाचवला. तुझी मुले, मुली, बायका दासी यांचे प्राण वाचवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यवाब घरात राजाकडे जाऊन म्हणू लागला, “आपल्या सेवकांनी आज आपला, आपल्या पुत्रांचा, कन्यांचा, पत्नींचा आणि आपल्या उपपत्नींचा प्राण वाचवला आहे; त्या आपल्या सेवकांचे तोंड आपण आज काळे केले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर योआब घरात राजाकडे गेला आणि म्हणाला, “आज तुम्ही तुमच्या सर्व सैन्याला अपमानित केले आहे, ज्यांनी तुमचा जीव वाचविला आणि तुमची मुले, मुली, तुमच्या पत्नी व उपपत्नींना वाचविले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यवाब राजाच्या निवासस्थानी आला आणि त्यास म्हणाला, आपल्या सेवकांना तुम्ही आज मान खाली घालायला लावली आहे. तुमच्या सेवकांनी तुमचा जीव वाचवला. तुमचे पुत्र, कन्या, पत्नी, पत्नी दासी यांचे प्राण वाचवले.