2 Samuel 20:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यवाबाच्या डाव्या हातातील तलवारीकडे अमासाचे लक्ष नव्हते. पण तेवढ्यात यवाबाने अमासाच्या पोटात तलवार खुपसली, आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. यवाबाला पुन्हा वार करावा लागलाच नाही. अमासा गतप्राण झाला. यवाब आणि त्याचा भाऊ अबीशय यांनी बिक्रीचा मुलगा शबा याचा शोध चालूच ठेवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यवाबाच्या हाती असलेल्या तलवारीकडे अमासाचे लक्ष गेले नाही; त्याने अमासाच्या पोटात ती भोसकून त्याची आतडी जमिनीवर पाडली; त्याने त्याला पुन्हा वार केला नाही; तेवढ्यानेच त्याचा प्राण गेला, मग यवाब व त्याचा भाऊ अबीशय ह्यांनी बिक्रीचा पुत्र शबा ह्याचा पाठलाग केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अमासा योआबाच्या हातातील खंजिराविषयी सावध नव्हता आणि योआबाने तो त्याच्या पोटात खुपसला आणि त्याच्या आतड्या जमिनीवर पडल्या. पुन्हा वार न करताच अमास मरण पावला. नंतर योआब आणि त्याचा भाऊ अबीशाई यांनी बिकरीचा पुत्र शबाचा पाठलाग केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)