2 Samuel 20:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अमासा रस्त्याच्या मध्याभागी सक्ताच्या थारोळ्यात पडला होता. येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून हे दृष्य पाहतोय हे त्या तरुण सैनिकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने ते प्रेत रस्त्यावरुन ढकलत शेतात नेऊन टाकले. त्याच्यावर एक कापड अंथरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अमासा भर रस्त्यात रक्तात लोळत पडला होता. सर्व लोक स्तब्ध उभे आहेत असे त्या माणसाने पाहिले तेव्हा त्याने अमासाला सडकेवरून काढून एका शेतात नेले; तेथेही जो येतो तो स्तब्ध उभा राहतो असे पाहून त्याने त्याच्यावर एक वस्त्र टाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अमासा भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात लोळत होता आणि त्या मनुष्याने पाहिले की, सर्व सैन्य स्तब्ध उभे होते. जेव्हा त्याला समजले की, प्रत्येकजण अमासापर्यंत येऊन थांबत होते, तेव्हा त्याने त्याला रस्त्यावरून ओढून शेतात नेले आणि त्याच्यावर एक वस्त्र टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अमासा रस्त्याच्या मध्याभागी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून हे दृष्य पाहतोय हे त्या तरुण सैनिकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने ते प्रेत रस्त्यावरून ढकलत शेतात नेऊन टाकले. त्याच्यावर एक कापड अंथरले.