2 Samuel 22:43 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखे ते क:पदार्थ बनले. त्यांचा मी चेंदामेंदा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा भूमीवरच्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना तुडवून दाबून टाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वीच्या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला; रस्त्यावरील चिखलाप्रमाणे त्यांना मी कुटून आणि तुडवून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखा त्यांचा मी भुगा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.