2 Samuel 23:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
थकून अंगात त्राण राहिलं नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवार घटृ पकडून त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग लोक तिथे आले. पण शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा आपला हात थकून तलवारीस चिकटेपर्यंत एलाजार पलिष्ट्यांना मार देत राहिला. त्या दिवशी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला, त्याच्यामागून लोक गेले ते केवळ लुटालूट करायला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु एलअज़ार युद्धभूमीवर राहून, त्याचा हात थकेपर्यंत व तलवारीला त्याचा हात चिकटून जाईपर्यंत त्याने पलिष्ट्यांना ठार मारले होते. त्या दिवशी याहवेहने त्यांना मोठा विजय प्राप्त करून दिला. सैन्य पुन्हा एलअज़ारकडे आले ते केवळ मेलेल्यांना लुटायला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
थकून अंगात त्राण राहिला नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवारीला हात चिकटेपर्यंत त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते लोक तिथे आले.