2 Samuel 23:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद म्हणाला, “परमेश्वरा, हे मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल.” म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “हे परमेश्वरा, असे कृत्य माझ्याकडून न घडो; जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय?” ह्यास्तव तो ते पिईना; त्या तीन वीरांनी हे कृत्य केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीद म्हणाला, “मी असे करणे माझ्यापासून दूर असो, हे याहवेह! ज्या पुरुषांनी आपला जीव धोक्यात घालून आणले, त्यांचे ते रक्त नाही काय?” म्हणून दावीद ते पाणी प्याला नाही. अशी साहसी कामे त्या तीन पराक्रमी योद्ध्यांनी केली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद म्हणाला, “परमेश्वरा, हे पाणी मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल.” म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली.