2 Samuel 23:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी माणसाचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले. मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कबसेल येथला एक माणूस होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले; आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहाला ठार केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कबसेल येथील एक शूर मनुष्य होता, जो यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे बर्फाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी मनुष्याचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला.