2 Samuel 24:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेमच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वराला फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे.” तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण देवदूताने यरुशलेमेचा नाश करण्यासाठी त्यावर आपला हात उगारला तेव्हा परमेश्वराला त्या अरिष्टाविषयी वाईट वाटले, व त्याने लोकांचा नाश करणार्या देवदूतास म्हटले, “आता पुरे कर, आपला हात आटोप.” त्या वेळी परमेश्वराचा दूत अरवना यबूसी ह्याच्या खळ्यानजीक होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा यरुशलेमचा नाश करण्यासाठी दूताने आपला हात लांब केला, तेव्हा याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि लोकांचा नाश करणार्या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेमेच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला. पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वरास फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे.” तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता.