2 Samuel 24:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अरवना म्हणाला, “माझे स्वामी का बरे आले आहेत?” दावीद म्हणाला, “तुझे खळे विकत घ्यायला. म्हणजे मग मी परमेश्वरा प्रीत्यर्थ इथे एक वेदी बांधीन. मग रोगराई संपुष्टात येईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरवना म्हणाला, “माझ्या स्वामीराजांचे आपल्या दासाकडे येणे का झाले आहे?” दावीद म्हणाला, “तुझ्यापासून हे खळे विकत घेण्यासाठी मी आलो आहे; लोकांवरली ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रीत्यर्थ मला एक वेदी बांधायची आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरवनाहने विचारले, “माझे स्वामी आपल्या सेवकाकडे का आले आहेत?” दावीदाने उत्तर दिले, “मी तुझे खळे विकत घेण्यासाठी आलो आहे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरवना म्हणाला, “माझे स्वामी का बरे आले आहेत? दावीद म्हणाला, तुझे खळे विकत घ्यायला. म्हणजे मग मी परमेश्वरा प्रित्यर्थ इथे एक वेदी बांधीन. मग रोगराई संपुष्टात येईल.”