2 Samuel 5:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा, परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे हे ही त्याला उमगले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने इस्राएलावरील आपले राज्य स्थिर केले आहे आणि आपल्या इस्राएली प्रजेप्रीत्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली आहे हे दाविदाच्या ध्यानात आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा दावीदाने जाणले की, याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य उंच केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे, हे ही त्यास उमगले.