2 Thessalonians 2:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तर कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे फसवू नये. म्हणून सावध असा. मी असे म्हणतो कारण पहिल्यांदा मोठी बंडखोरी झाल्याशिवाय प्रभूचा दिवस येणार नाही. आणि जो नाशासाठी नेमला आहे, तो नियम मोडणारा प्रकट होईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर अंतिम बंड पुकारले जाऊन तो अनाचारी प्रकट होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रकट होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणी तुमची कोणत्याही प्रकारे फसवणूक करू नये, जोपर्यंत विश्वासाचे पतन होणार नाही आणि नियम नसलेला पुरुष म्हणजे नाशाचा पुरुष प्रकट होणार नाही तोपर्यंत तो दिवस येणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल;