2 Thessalonians 2:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो विरोध करील आणि स्वत:ला सर्व गोष्टींच्या वर उच्च करील. त्याला देव किंवा उपासना करण्याची कोणतीही एखादी वस्तु असे म्हणतील. येथपर्यंत की तो देवाच्या मंदिरात जाईल आणि सिंहासनावर बसेल आणि तो स्वत:ला देव असे जाहीर करील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो नाशाचा पुत्र, विरोधक असून तथाकथित प्रत्येक दैवत किंवा पूज्य म्हणून म्हणतात त्या वस्तूपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजून म्हणजे ‘मी देव आहे’, असे स्वतःचे प्रदर्शन करीत तो देवाच्या मंदिरात जाऊन बसेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो तथाकथित देव किंवा भजनीय वस्तूंचा विरोध करेल व या सर्वांहून स्वतःला उंच करेल, तो परमेश्वराच्या मंदिरात बसेल व मीच परमेश्वर आहे, असे जाहीर करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे.