2 Thessalonians 3:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रभूमध्ये आम्हांला तुमच्याविषयी विश्वास आहे आणि खात्री आहे की, जे आम्ही तुम्हाला करण्यासाठी सांगत आहोत ते तुम्ही करीत आहात व ते पुढे करीतच राहाल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला आज्ञा देऊन जे सांगतो, ते तुम्ही करीत आहात व पुढेही करीत राहाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला जे सांगतो ते तुम्ही करत असता व पुढेही करत जाल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि आम्हाला प्रभूमध्ये भरवसा आहे की आम्ही आज्ञापिलेल्या गोष्टी तुम्ही करता आणि करीतच राहाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा विश्वास आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल.