2 Timothy 1:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या भूतलावर अवतीर्ण होण्याने प्रगट करण्यात आली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशात आणले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु आता आपल्याला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने ती दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि शुभवर्तमानाद्वारे शाश्वत जीवन प्रकट केले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले, आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर आता आपला तारणारा ख्रिस्त येशूंच्या देखाव्याने प्रकट झाली आहे, ज्यांनी एकीकडे मृत्यूचा नाश केला आणि दुसरीकडे ईश्वरीय शुभवार्तेद्वारे जीवन आणि अमरत्व प्रकाशित केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जी आता आम्हास आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.