2 Timothy 2:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांना या गोष्टीची आठवण करुन देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दांविषयी भांडू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. फक्त जे ऐकतात त्यांचा ते नाश करते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण करून दे, त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, वितंडवाद करू नका. तो कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण दे; त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, शब्दयुद्ध करू नका; ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणार्यांच्या नाशास कारण होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या लोकांना या गोष्टींची आठवण करून देत राहा. परमेश्वरासमोर त्यांना इशारा दे की त्यांनी शाब्दिक वाद करू नये. याचा कोणालाही फायदा होत नाही, परंतु यामुळे ऐकणार्यांचा नाश होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांस या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दयुद्ध करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते.