2 Timothy 2:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनविलेलीही असतात. काही प्रतिष्ठेच्या कामात वापरण्यासाठी असतात तर दुसरी काही कनिष्ठ प्रतीच्या कामी वापरण्यासाठी नेमलेली असतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यांपैकी कित्येकांचा उपयोग विशेष प्रसंगी केला जातो व काहींचा सामान्य कार्यासाठी केला जातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात; त्यांपैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोठ्या घरात सोन्याचांदीची, तशीच काही लाकडाची व मातीची बनविलेली पात्रे असतात. काही विशेष उद्देशासाठी व काही सामान्य वापरासाठी आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनवलेलीही असतात. काही सन्मानास व काही अवमानास नेमलेली असतात.