2 Timothy 4:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवासमोर आणि ख्रिस्त येशूसमोर मी तुला गांभीर्याने आज्ञा करतो, जे जिवंत आहेत व जे मेलेले आहेत त्यांचा येशू ख्रिस्त हाच न्याय करणार आहे. येशू ख्रिस्ताचे राज्य व त्याचे परत येणे याविषयी घोषणा कर. मी तुला देवासमोर व ख्रिस्तसमोर ही आज्ञा करतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष आणि तो व त्याचे राज्य येणार आहे हे लक्षात घेऊन मी तुला निक्षून आवाहन करतो की,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवासमक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वरासमक्ष आणि जे आपले राज्य स्थापन करण्यासाठी येतील, तेव्हा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करतील, त्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आदेश देतो की:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,