2 Timothy 4:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण तुझ्याबाबतीत स्वत: सावधानतेने वाग, दु:ख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु तू सर्व गोष्टींविषयी सावध रहा, दुःखे सोस, शुभवर्तमान प्रचारकाचे सेवाकार्य कर व तुझ्याकडे सोपविलेली पूर्ण जबाबदारी देवाचा सेवक म्हणून पार पाड.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु या सर्व विषयांमध्ये सावध राहा; दुःख सहन कर; ईश्वरीय शुभवार्तेच्या प्रचारकाचे काम कर आणि आपली सेवा पूर्ण कर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.