3 John 1:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे बंधु आले व ज्यांनी तू दाखविलेल्या प्रीतिविषयी मंडळीसमोर साक्ष दिली, त्यांच्या पुढील वाटचालीकारिता देवाला आवडेल अशा प्रकारे
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी ख्रिस्तमंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी येथे साक्ष दिली आहे. देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना पुढची वाटचाल करण्यास साहाय्य कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी मंडळीसमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली; देवाला आवडेल अशा रीतीने तू त्यांना वाटे लावशील तर बरे करशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी मंडळीला तू दाखविलेल्या प्रीतीविषयी साक्ष दिली आहे. कृपा करून त्यांना अशाप्रकारे निरोप देऊन पाठव की ज्यामुळे परमेश्वराचे गौरव व्हावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी तू दाखविलेल्या प्रीतीविषयी मंडळीसमोर साक्ष दिली, देवाला आवडेल त्या रीतीने तू त्यांना वाटेस लावशील तर बरे करशील.